मंत्र्यांच्या आगमनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध !

केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कोपरा गावासमोर एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध केला. या रस्त्याचे काम १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित होते.

मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नलविना होणार !

मानखुर्दवरून ठाणे दिशेकडील १.२३ कि.मी. लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला !

मुंबई येथील घरी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे.

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

भारतात नियम पाळावे लागतील अन्यथा कारागृहात जावे लागेल ! – ट्विटरचे इलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती

भारतात सामाजिक माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्‍चात्त्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र देते, तेवढे समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.

गायनाच्या कार्यक्रमांमध्ये गायक गाण्याऐवजी ओठांची केवळ हालचाल करतात ! – गायक पलाश सेन यांचा दावा

रिअ‍ॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअ‍ॅलिटी (सत्यता) नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो केवळ एक टीव्ही शो असून तो ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेसारखा पहायला हवा.

शासकीय कामकाजात मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी राज्यशासन धोरण निश्‍चित करणार !

‘मराठी भाषा सल्लागार समिती’ची मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याविषयी सर्वंकष धोरण लवकरच घोषित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना ‘ईडी’ची क्लीन चिट ?

अजित पवार यांचे ‘ईडी’च्या आरोपपत्रात नावच नाही ! पुढील सुनावणी १९ एप्रिलला !

मुंबई येथे ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

साधना करणार्‍या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !