राज्यातील ७५ शहरांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड होणार !

आधुनिक औषधे उपलब्ध नसतांना भारतात वनस्पतींद्वारे होत असलेले परंपरागत औषधोपचार औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे बंद झाले आहेत. अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची महाराष्ट्रात पुन्हा लागवड करण्यात येणार आहे.

राज्यातील ७५ धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार बेल उद्यानाची निर्मिती !

राज्यातील ७५ धार्मिक स्थानांच्या ठिकाणी ‘बेल वन उद्यान’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाच्या वनविभागाने घेतला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाकडून याविषयी घोषणा करण्यात आली होती.

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

अशी पोस्ट एखाद्या हिंदूने चुकून अली यांच्या समाजाविषयी केली असती, तर आतापर्यंत त्याचे काय परिणाम झाले असते, हे वेगळे सांगायला नको !

भोईवाडा (मुंबई) येथे १२ ते १८ एप्रिल कालावधीत अखंड नामजप, यज्ञ सप्ताह !

श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांच्या भोईवाडा (शिवडी) येथील केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी प्रित्यर्थ १२ ते १८ एप्रिल  या कालावधीत अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी यामध्ये आणखी १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी अशोक चौरे यांनी संशयितांची नावे सांगूनही अद्याप कुणाला अटक करण्यात न आल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा होणार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील..

राज्यातील गावागावांत मिळणार वड-पिंपळ वृक्षांची छाया !

प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावांमध्ये वन उद्यानांची निर्मिर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब आणि देशी आंबा या वृक्षांच्या पंचायतन वन उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.

सरसंघचालकांच्या नावे प्रसारित करण्यात आलेल्या बनावट पत्रात मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.