राणा दांपत्याची गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचे परिणाम आणि न्यायालयीन निवाडे

ध्वनीक्षेपक वापरणे, हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका !

इंडियन बार असोसिएशनने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

पुढील सुनावणीपर्यंत नील सोमय्या यांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !

आय.एन्.एस्. निधी अपहार प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अवैध भोंगे हटवण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी ! – संतोष पाचलग, याचिकाकर्ते

अवैध भोंग्यांच्या विरोधात आम्ही प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढून टाकण्याचे स्पष्ट आदेश वर्ष २०१६ मध्ये दिले होते. असे असूनही त्याची कार्यवाही मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस यांनी केली नाही.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्याप्रकरणातील आरोपींना १ दिवसाची पोलीस कोठडी !

आझाद मैदानावर आंदोलन करतांना एस्.टी. कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी दगडफेक, तसेच चप्पल भिरकावण्याचे प्रकार केले होते.

महाराष्ट्रातील १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बनावट !

या प्रकरणात सहभागी असलेले शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अधिकारी यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, असेच जनतेला वाटते !

उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेनंतरही पोलिसांकडून प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांवर कारवाई नाही !

न्यायालयाचा अवमान करणार्‍या प्रशासनावर न्यायालयाने कठोर कारवाई केली, तरच यापुढे न्यायालयाचा अवमान करण्यास कुणी धजावणार नाही !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते या कटामागचे सूत्रधार (मास्टर माईंड) आहेत.

एस्.टी. कर्मचारी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू न झाल्यास कारवाईची शक्यता ! – मुंबई उच्च न्यायालय

संप करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एस्.टी. महामंडळ कारवाई करू शकते, असे निर्देश ६ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.