बीड परिवहन कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय !

नागरिकांची गैरसोय करणार्‍या सरकारी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच ही स्थिती पालटेल, असे जनतेला वाटते.

तुर्भे येथे डासांच्या प्रादुर्भावामुळे रहिवाशी त्रस्त !

तुर्भे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. जेवतांनाही तोंडामध्ये डास जातात, अशी परिस्थिती आहे. डासांमुळे रात्रीची झोपही लागत नाहीत. २४ घंटे डासांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

१० वर्षांनंतरही पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील बी.आर्.टी. मार्ग अपूर्ण, कोट्यवधींचा व्यय पाण्यात !

कोट्यवधी रुपये खर्चूनही लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिका त्यावर काय उपाययोजना काढते ? अशा प्रकारे महापालिकेचा कारभार चालू असेल, तर तिच्याकडून कधीतरी जनहित साधले जाईल का ?

राजभाषा मराठी; मात्र उदात्तीकरण उर्दूचे !

भविष्यात महाराष्ट्रात मराठी भाषाभवन उभेही राहील, मराठीला राजभाषेचा दर्जाही मिळेल; मात्र मराठीच्या उत्कर्षासाठी मुळात सरकारने नागरिकांमध्ये मराठी भाषेविषयी अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने केवळ धोरण न ठरवता त्याची वास्तवातील प्रभावी कार्यवाही करण्याची  उपाययोजनाही ठरवायला हवी !

रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे डॉक्टर तरुणीचे १०० जणांनी घरात घुसून केले अपहरण !

एका डॉक्टर तरुणीचे अशा प्रकारे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार आहे कि नाही ?

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?

संभाजीनगर महापालिकेने अहवाल सादर करणे बंद करून पाणी द्यावे ! – खंडपिठाचे वक्तव्य

जे काम प्रशासन आणि मंत्री यांना करायला हवे, ते न्यायालयाला सांगावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद !

हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाही !

डिंभे धरणाजवळील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ मुंबई यांनी मासेमारी करण्यासाठी अजून कुणालाही दायित्व दिले नाही, तसेच मत्स्यबीजही सोडले नाही.

ऐतिहासिक स्मारके नेहमीच स्वच्छ हवीत. कधीतरी स्वच्छता होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनेक ठिकाणी ‘ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटना, सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाची स्वच्छता केली.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बसस्थानकाची दुरवस्था !

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून सहस्रो भाविक येथे येत असतात; मात्र येथील प्रवासी सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे छत नादुरुस्त झाल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे.