बीड परिवहन कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय !

बीड – शहर आणि ग्रामीण भागांतून प्रतिदिन शेकडो नागरिक परिवहन कार्यालयात येतात; मात्र कार्यालयात कुणाचाच समन्वय नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कधी ‘इंटरनेट नाही, तर कधी ‘सर्व्हर डाऊन’ आहे, कधी ‘पासवर्ड’ साहेबांकडे आहे’, अशी उडवाउडवीची उत्तरे कर्मचार्‍यांकडून दिली जात आहेत. बहुतांश अधिकारी आणि लिपिक त्यांच्या जागी उपस्थित नसतात किंवा विलंबाने कार्यालयात येतात. अनेक कर्मचारी संभाजीनगर येथील रहिवासी असल्याने त्यांना प्रवास करून कार्यालयात येण्यास विलंब होतो.

परिवहन विभागाची अनुमाने सर्व कामे संगणकीय पद्धतीने होतात, तरीही किरकोळ कामासाठीही नागरिकांना अनेक वेळा कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. (नागरिकांची गैरसोय करणार्‍या सरकारी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच ही स्थिती पालटेल, असे जनतेला वाटते. – संपादक)