सारथी फाऊंडेशनच्या वतीने १५ ऑगस्टच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !

अधिक माहितीसाठी पू. संतोष दाभाडेमाऊली – ८६००९४७७८९, श्री. चेतन दाभाडे – ९४२३०३७८३३ यांना या क्रमांकावर संपर्क साधावा.

सातारा शहरामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढले

नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

टाटा रुग्णालयात कर्करोगावर ‘प्रोटॉन’ उपचारपद्धतीची सुविधा !

एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी उपचारपद्धतीने उपचार देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध आहे.

मेळघाट (जिल्हा अमरावती) येथे सव्वा वर्षात आरोग्य सुविधा मिळण्यास विलंब झाल्यामुळे २६२ बालकांचा मृत्यू !

हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !

राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण ! !

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ १० वर्षेच आरक्षण देणे अपेक्षित होते, हे येथे लक्षात घ्यायला हवे !

चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना !

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे ४३ जणांच्या मदतकार्य पथकाने महाडमध्ये साहाय्य करण्यास प्रारंभ केला. हे पथक आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य यांसह २५ जुलै या दिवशी चिपळूण येथे पाठवण्यात आले आहे.

स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया होत असतांना युवती म्हणत होती श्री हनुमान चालिसा !

तब्बल ३ घंटे चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी
धर्म, अध्यात्म, साधना, उपासना आदी सर्व खोटे असल्याची ओरड करणारे नास्तिकतावादी, तथाकथित विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आदींना सणसणीत चपराक !

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र ‘नीट (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा )’ परीक्षाकेंद्र संमत

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही केंद्रांवरून (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ) ही परीक्षा देता येणार आहे.

‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) किंवा ‘ब्लॅक फंग्स’ या आजाराची लक्षणे आणि त्यावरील होमिओपॅथी औषधांचे उपचार !

या लेखामध्ये दिलेल्या औषधांसह शासनाने प्राधिकृत केलेली वैद्यकीय चिकित्सा आणि औषधे घेणे टाळू नये. योग्य त्या वैद्यांचा सल्लाही घ्यावा.

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण !

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे आयुर्वेदिक काढे, तसेच डॉक्टरांकडून होणारा अँटिबायोटिक्सचा अतिरिक्त वापर यांमुळे कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे.