सिंधुदुर्ग – इयत्ता १२ वीनंतर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा – NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST ) परीक्षा देता यावी, यासाठी आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत स्वतंत्र केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.
यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर किंवा मुंबई येथे जावे लागत होते. आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही केंद्रांवरून ही परीक्षा देता येणार आहे.