राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण ! !

केंद्रशासनाचा निर्णय !

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ १० वर्षेच आरक्षण देणे अपेक्षित होते, हे येथे लक्षात घ्यायला हवे !

नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांतही केंद्रीय कोट्यांतर्गत राखीव १५ टक्के जागांवर ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रशासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे आरक्षण आधीपासूनच लागू आहे. आजवर राज्यशासनांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केंद्रीय कोट्यांतर्गत केवळ अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांनाच आरक्षण मिळत होते.