कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण !

पुणे – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे आयुर्वेदिक काढे, तसेच डॉक्टरांकडून होणारा अँटिबायोटिक्सचा अतिरिक्त वापर यांमुळे कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे. मागील काही काळात ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती अशांनाच मूळव्याधीचा अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. काढ्याचे अत्याधिक सेवन केल्यामुळे ‘हायपर ऍसिडिटी’, जळजळ, अतिसार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो अशी माहिती डॉ. अशिष पोरवाल यांनी दिली, तर व्हिटॅमिन सी आणि झिंकच्या अतिरिक्त सेवनामुळे फिशरची समस्या निर्माण होत असल्याचे डॉ. परेश गांधी यांनी सांगितले.