मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !

मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्‍चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?

संमेलनाच्या निधीची वाढीव २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही !

संमेलन अगदी समीप आलेले असतांना सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात राजकीय मंडळींची लगबग अधिक !

येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !

संमेलनात पंचपक्‍वानांसाठी अधिक खर्च करण्‍यापेक्षा तो पैसा मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन यांसाठी खर्च केला असता, तर ते उचित झाले असते !

मराठी साहित्‍य संमेलनाला २ सहस्र साहित्‍यिक, कवी, विचारवंत आणि साहित्‍य रसिक प्रतिनिधी उपस्‍थित रहाण्‍याची शक्‍यता आहे. आयोजकांकडून त्‍यांच्‍यासाठी पंचपक्‍वानांची रेलचेल असणार आहे.

मराठी साहित्‍य संमेलन अजूनही अनुदानाच्‍या प्रतीक्षेत !

येथे येत्‍या ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ९६ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाची सिद्धता जोरात चालू आहे. हे संमेलन येथील स्‍वावलंबी विद्यालयाच्‍या मैदानात होणार आहे.

वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी येथे २९ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

‘मराठी’ हरवलेले ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

साहित्यिकांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलने यांचा ऱ्हास होत असतांना ‘निरो’ बनू नका. आपल्या लेखण्या उचला किंवा तोंड उघडा आणि यावर लिहिते व्हा !

गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा !

‘‘एक सहस्र वर्षांपासून गोव्यातील जनतेची भाषा ही मराठी आहे. पोर्तुगीज काळातही सामान्य समाज सर्व व्यवहार मराठीतूनच करत होती. १९ व्या आणि २० व्या शतकात गोव्यात मराठी वाङमयाची निर्मिती झाली. गोव्यात आजही १० हून अधिक मराठी वृत्तपत्रे आहेत.

केंद्र सरकारने मराठी भाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा !

मराठी शाळांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्था यांना, तसेच महाविद्यालये यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.