९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण !

आज संमेलनास प्रारंभ होणार !

३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संमेलन

वर्धा (राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी), २ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. ‘न भूतो न भविष्यति’ होणार्‍या या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे आहेत. संपूर्ण साहित्यनगरीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. साहित्य संमेलनाची सिद्धता पहाता ते भव्य-दिव्य होणार आहे.