पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकांची आवश्यकता असू शकत नाही ! – ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर
शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.