साहित्य संमेलन कि धर्मद्रोह्यांचा अड्डा ?
साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
एकाही कार्यक्रमापासून साहित्य रसिक वंचित राहू नयेत, यासाठी संमेलनाची ‘सोशल मीडिया-डिजीटल मार्केटिंग’ समिती संपूर्ण संमेलन रसिकांपर्यंत पोचवणार आहे !
संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ऑनलाईन’ करणार असून संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील…
संमेलनात विविध गोष्टींवरून वाद चालूच आहे. यामुळे साहित्यिकांच्याच अगाध (?) ज्ञानाचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार आहेत. आमदारांनी विशेष गोष्ट म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद . . .
‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा हिंदुविरोधी लोकांना सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’
एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !
मराठी भाषेसाठी योगदान देणार्यांनाच मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित करणे उचित आहे ! गेल्या अनेक वर्षांपासून तसे होत नसल्यामुळेच साहित्य संमेलनाची पत झपाट्याने घसरत आहे ! याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !
संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्मिती करण्यात आलेल्या या गीतात ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असतांना सावरकरांचे नाव का नाही ?’, असा प्रश्न सावरकरप्रेमींनी व्यक्त केला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष, अवमान करणारे साहित्यिक, राजकारणी यांचा सहभाग असलेल्या साहित्य संमेलनावर हिंदूंना बहिष्कार घालावासा वाटला, तर चूक ते काय ?