
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – महाविकास आघाडीच्या काळात संमत करण्यात आलेल्या कामांना राज्यशासनाने दिलेल्या स्थगितीच्या विरोधात २० डिसेंबर या दिवशी विरोधकांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या आसनापुढे येऊन विरोधकांनी घोषणा दिल्या. यामुळे अध्यक्षांनी प्रथम १० मिनिटांसाठी, नंतर १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
विरोधकांच्या घोषणा चालू असतांनाच तारांकित प्रश्न घेण्यात आले. गोंधळाच्या स्थितीमुळे प्रश्नोत्तराच्या तासिकेला केवळ दोनच तारांकित प्रश्न होऊ शकले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नानंतर २ मिनिटे बोलण्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत