ज्यांनी धान गायब केले, त्यांना पकडण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली.