मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची होणार ‘ड्रोन’द्वारे होणार पहाणी ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मे २०२३ पर्यंत महामार्गाची एक लेन पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल.

‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गरीब रुग्णांना सवलत न देणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार !  – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

देवस्थानांच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वाघ आणि बिबटे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर जंगलाचे क्षेत्र न्यून होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्था उभी करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या अडवून ठेवलेल्या गायींची त्वरित सुटका करावी ! – जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्व गाड्या कर्नाटकातील तुमकूर येथील पोलीस ठाण्यात अडवून ठेवल्या आहेत. या सर्व प्रकारात एका गायीचा मृत्यू झाला आहे.

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातील शेतकरी हवालदिल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. हवामान विभागाने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे; मात्र राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. 

सत्ताधार्‍यांना गांभीर्य नसून भोंगळ कारभार चालू आहे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

विधानसभेत यापूर्वी २ वेळा मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी अप्रसन्नता व्यक्त केली होती. तोच प्रत्यय १७ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांना पुन्हा पहायला मिळाला. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा चालू असतांना विविध विभागांचे मंत्री अनुपस्थित असल्याने त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली.

खरा सूत्रधार शोधून दोषींवर लवकरच कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर लवकरच कारवाई होईल; मात्र खरा सूत्रधार कोण हेही शोधले जाईल.

नाशिक महापालिका ‘एस्.टी.पी. प्लांट’चे ‘अमृत योजने’च्या माध्यमातून होणार आधुनिकीकरण !

विधानसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी स्वच्छतेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.