Indian Origin Lawmaker Against Tariffs : भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्याकडून निषेध !

अमेरिकेने भारतावर २७ टक्के कर लादल्याचे प्रकरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार राजा कृष्णमूर्ती

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्‍या वस्तू आणि सेवा यांवर २७ टक्के कर लादला आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी याचा निषेध केला. चीनच्या सैनिकी आणि आर्थिक आक्रमकतेचा सामना करण्यासाठी भारत-अमेरिका भागीदारी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या कराराचा अमेरिका-भारत संबंधांवर अनावश्यक ताण येऊ शकतो, असे राजा कृष्णमूर्ती म्हणाले.

कृष्णमूर्ती पुढे म्हणाले की,

१. ट्रम्प यांनी भारतावर लादलेला कर केवळ दिशाभूल करणाराच नाही, तर अमेरिकेच्या आर्थिक, राजनैतिक आणि सुरक्षा हितसंबंधांसाठीही हानिकारक आहे.

२. अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री मजबूत आहे; परंतु नवीन करांमुळे अमेरिकन कुटुंबांचा खर्च वाढेल. यामुळे अमेरिकन आणि भारतीय व्यवसायांवर अतिरिक्त भार पडेल.

३. त्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर लादलेला कर मागे घ्यावा.