आमदार विधानसभेत धिंगाणा घालण्यासाठीच येतात का ?

लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्‍याच प्रश्‍नांवरून गोंधळ घालत आहेत.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या उपस्थित केलेल्या सूत्रावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

चर्चा करून जनतेचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा गोंधळ घालून सभागृहाचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? हेच दिसून येते !

राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न; अधिवेशन संपण्यापूर्वी ‘पेनड्राईव्ह’ देणार ! – शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनेच लोकशाहीची वस्तुस्थिती मांडून लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अशी लोकशाही जनतेचे हित कसे साधणार ?

‘पेनड्राईव्ह’मधून सादर केलेल्या पुराव्यांची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात जाऊ ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

८ मार्च या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:वरील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात होत असलेल्या षड्यंत्राच्या पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’ विधानसभेत सादर केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांविषयी आज ‘दूध का दूध, पानी का पानी’ करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप करत ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सादर केली होती.

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेतून सभात्याग !

विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाच्या तासिकेपूर्वी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून लक्ष्य करत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर केले !

विधानसभेत निलंबित केलेले १२ आमदार कोणत्या नियमाच्या आधारे सभागृहात उपस्थित रहातात ? – काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा प्रश्‍न  

त्यांना अनुमती कुणी दिली ? अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

मौजे पाभळ (जिल्हा यवतमाळ) येथील शिधावाटप दुकानावर निलंबनाची कारवाई ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !

राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये उभारणीसाठी ‘हुडको’कडून ४ सहस्र कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील आरोग्य विभागाच्या संदर्भातील चर्चेला उत्तर देतांना बोलत होते.