नागपूर शहरातील एकही ऑक्सिजन प्रकल्प बंद नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

हवेतील ऑक्सिजन शोषून घेणार्‍रा पी.एस्.ए. प्रकल्प

मुंबई – शहरातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील हवेतील ऑक्सिजन शोषून घेणार्‍या पी.एस्.ए. (प्रेशर स्वींग एडॉर्प्शन) प्रकल्पातील एकही प्रकल्प बंद नाही. शासकीय रुग्णालयामध्ये एकूण १५ पी.एस्.ए. प्रकल्प मंजूर आहेत. त्यांपैकी १२ प्रकल्प कार्यान्वित असून ३ प्रकल्पांची उभारणी चालू आहे, तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानातील ३ पी.एस्.ए. प्रकल्प उभारणीचे कार्य चालू असल्याने ते अद्याप कार्यान्वित नाहीत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेमध्ये दिली.

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

याविषयी शहरातील हवेतील ऑक्सिजन शोषून घेणारे पी.एस्.ए. २६ प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प बंद स्थितीमध्ये आहेत, याविषयीचा प्रश्न आमदारांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता.