विधानसभेच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांचे समोरासमोर आंदोलन !

‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ अशा सत्ताधार्‍यांकडून घोषणा !

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – हिवाळी अधिवेशनाच्या २० डिसेंबरच्या दुसर्‍या दिवशी अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी प्रथम विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली, तर त्याचठिकाणी सत्ताधार्‍यांकडूनही आंदोलन करण्यात आले. ‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ अशा घोषणा सत्ताधार्‍यांनी दिल्या.

या वेळी विरोधकांनी ‘महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक’, ‘महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवणार्‍या मिंधे सरकारचा धिक्कार असो’, ‘गद्दारीचे पाप, महाराष्ट्राला ताप’, आदी घोषणा दिल्या. या वेळी शिंदे-भाजप गटातील आमदारांनी ‘साधु-संत, वारकरी आणि सावरकर यांचा अवमान करणार्‍यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या.