
संभल (उत्तरप्रदेश) : येथील कथित शाही जामा मशिदीत पूजा आणि धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना कह्यात घेतले. सनातन सिंह, वीर सिंह यादव आणि अनिल सिंह अशी त्यांची नावे असून ते देहली येथे रहाणारे आहेत. श्री हरिहर मंदिर पाडून येथे मशीद बांधण्यात आली होती.