देशात निकोप स्पर्धा असल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले ! – शायना एन्.सी., प्रवक्त्या, भाजप

‘मेन इन इंडिया’ अंतर्गत देशाची प्रगती चालू आहे. आपण जेव्हा एखाद्या उद्योगपतीच्या दृष्टीने विचार करतो, तेव्हा त्याला जी परिस्थिती योग्य वाटेल, त्यानुसार तो निर्णय घेतो. संपूर्ण देशपातळीवर विचार केल्यास हा प्रकल्प देशाबाहेर गेला नसून केवळ दुसर्‍या राज्यात गेला आहे.

‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’च्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. यांचा २९ ऑक्टोबरला कोल्हापूर दौरा ! – गिरीष चितळे

नाना चुडासामा यांनी ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संघटनेच्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. या कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत चालणार्‍या कामांची पहाणी करणार असून तेथील विविध गटांना भेटणार आहेत.

ऋषीमुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय बाळगले होते ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

आपल्या ऋषी-मुनींनी सार्‍या विश्वाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय त्यांच्या उराशी बाळगले होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. मलकापूर-शाहुवाडी वैद्यकीय संघटनेच्या ‘श्री धन्वन्तरी जयंती’चे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील मुख्य शिखरावर प्रज्वलित करण्यात आला ‘काकडा’ !

आकाशासाठी म्हणजेच वायूसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर, त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात पूजा करण्यात आली होती.

परतीच्या पावसाने झालेल्या हानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

जे लोकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे, ते सरकार घेत आहे. याची कार्यवाही तात्काळ होत आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या अधिकोषात जमा होत आहेत. दीपावलीच्या कालावधीत परतीच्या पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. याचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात देवस्थान समितीच्या वतीने गाय-वासराची पूजा !

श्री महालक्ष्मी मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गरुड मंडपात गाय-वासरू यांची पूजा करण्यात आली. या प्रसंगी समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी मंदिरात वसुबारसच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीची विशेष अलंकारिक पूजा !

दीपावलीचा प्रारंभ झाला असून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीची वसुबारसच्या (२१ ऑक्टोबर) निमित्ताने विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यात देवीच्या मूर्तीसमोर गाय-बछडा यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती.

हिंदु समाजाच्या भावना दुखावणारा ‘थँक गॉड’ चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देऊ नका !

विनोदनिर्मितीसाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणार्‍यांवर संपूर्ण बहिष्कार टाका !