विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये हिंदूंच्या देवता, तसेच त्यांची श्रद्धास्थाने असलेल्या विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. यामुळे समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. या चित्रपटात यमदेवता आणि चित्रगुप्त यांच्या तोंडी विनोदी भाषा वापरून त्यांची टिंगल करण्यात आली आहे. यमदेवता आणि चित्रगुप्त यांना सुटाबुटात दाखवून त्यांच्या आजूबाजूला तोकडे कपडे घालून नर्तिकांसमवेत नाचतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखवणारा ‘थँक गॉड’ चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देऊ नका, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांना देण्यात आले.
या प्रसंगी सर्वश्री बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, मनोज निगुडकर, संदीप जाधव अनिकेत रोकडे, अमित कुंभार, मुकुंदराज उरुणकर, प्रताप घोरपडे, भीमराव कोकणे हे उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाविनोदनिर्मितीसाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणार्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका ! |