‘जयहिंद मित्रमंडळा’च्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात !

श्री. किरण दुसे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अहिल्यादेवी होळकर पतसंस्था इचलकरंजीचे माजी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य आणि करपल्लवी गोंधळी सोमाजी वाकसे, (कोपर्यात) शाहीर संजय जाधव-मिनचेकर

कोल्हापूर – उंचगाव येथील ‘जयहिंद मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. २१ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना, २२ एप्रिलला सकाळी ९ वाजता शिवजन्मकाळ सोहळा, तसेच सायंकाळी शाहीर संजय जाधव-मिनचेकर अन् त्यांचे सहकारी यांचा ‘शिवस्पर्श शौर्यगाथा शाहिरी पोवाडा’ सादर करण्यात आला. २३ एप्रिलला मर्दानी खेळ दाखवण्यात आले, तर २५ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

विशेष
या प्रसंगी ‘धर्मवीर संभाजीराजे लोककला शाहीर पथक-मिनचेकर’ या पथकाचे शाहीर संजय जाधव-मिनचेकर आणि त्यांचे सहकारी यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजल्यावर त्यांनी या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. संतोष सणगर यांचा राष्ट्र आणि धर्म कार्य करत असल्याविषयी विशेष सत्कार केला. याच समवेत सरनोबतवाडी येथील सरपंच सौ. शुभांगी किरण आडसुळ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण आडसुळ यांचाही सत्कार करण्यात आला.

श्री. संतोष सणगर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना ‘धर्मवीर संभाजीराजे लोककला शाहीर पथक-मिनचेकर’ या पथकातील कार्यकर्ते