रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी ३० जानेवारीला हुपरी (कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.

हरिप्रिया एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस एल्.एच्.बी. कोचवर धावणार !

महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती एक्सप्रेस या दोन्ही लिंक एक्सप्रेस आहेत. या एक्सप्रेस यापूर्वी ‘आय.सी.एफ्.’ कोचवर धावत होत्या.

संशयित शरद कळसकर याला ओळखण्यास पंचांस लागला १५ मिनिटांचा कालावधी !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एक संशयित शरद कळसकर यांच्याशी संबंधित एका घटनेची साक्ष संभाजीनगर येथील पंच राजेश परदेशी यांची २५ जानेवारीला न्यायालयात नोंदवण्यात आली.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

१७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्‍या कौशल्या सांगलेआजी !

सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती.

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उंचगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्या निमित्ताने १९ जानेवारीच्या रात्री आयोजित कार्यक्रमात ‘रामराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ते बोलत होते.

२१ जानेवारीला पंचगंगा नदीकाठी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

२१ जानेवारीला पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ या नामजपाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे या सोहळ्याचे ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी ७ सहस्रांहून अधिक स्वामीभक्त त्यात सहभागी होतात.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे २२ जानेवारीला मांसविक्री आणि मद्यबंदीचे आदेश !

या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी गेली ३१ वर्षे अनवाणी रहाणारे शिये (जिल्हा कोल्हापूर) येथील निवास पाटील !

श्री. निवास पाटील म्हणाले, ‘‘६ डिसेंबर १९९२ या दिवशी झालेल्या कारसेवेत माझ्यासह १५ शिये ग्रामस्थांचा सहभाग होता.