श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा पहाणी अहवाल सादर करण्याविषयी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकार्‍यांना न्यायालयाचा आदेश !

मूर्तीची स्थिती गंभीर असून त्यासाठी आता पहाणी होऊन जो अहवाल येईल, तो मूर्तीची सत्यस्थिती सांगणारा असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानाच्या अध्यक्षपदी वैभव काळू पुजारी यांची निवड !

नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. 

दीड सहस्रांहून अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कोल्हापूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी ५ वे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

२४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले हा सत्तेचा गैरवापर ! – शरद पवार, खासदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याविषयी काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी माझ्यासह मल्लीकार्जुन खर्गे, डी. राजा, तसेच तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे

दुधाळी नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण ! – सुशील भांदिगरे, पंचगंगा विहार मंडळ

दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !

पंचगंगा नदीवर वळीवळे बंधार्‍याजवळ सहस्रो मासे मृत्यूमुखी : मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड !

केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !

नृसिंहवाडीत कृष्णावेणी उत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तप:साधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावर कृष्णावेणी उत्सवास १६ फेब्रुवारीला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

केंद्र आणि राज्य सरकार यांची कामे ‘शिवदूत’ बनून जनतेपर्यंत पोचवा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेसाठी ४०० हून अधिक जागा जिंकून आणण्याचे ध्येय दिले असून महाराष्ट्रात आपल्याला ४५ हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत.