गाझा पट्टीतील निर्वासित छावणीवर इस्रायलने केलेल्या आक्रमणात ५१ पॅलेस्टिनी ठार !

इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल आक्रमणात गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असतांनाही हमासकडून २४० ओलिसांची सुटका करण्यात येत नाही. यावरून हमासला जगाच्या पटलावर इस्रायलला ‘अमानुष’ ठरवायचे आहे, असेच लक्षात येते.

४ नोव्हेंबर या दिवशीच्या हमास-इस्रायल युद्धाच्या घडामोडी !

इस्रयलमध्ये फसलेल्या गाझाच्या ३ सहस्र ३०० कर्मचार्‍यांना घरी जाण्याची अनुमती !

Israel Gaza War : हमास आतंकवाद्यांना इजिप्तमध्ये पाठवत आहे ! – इस्रायली सैन्य

इस्रायली सैन्य हमासची ठिकाणे आणि सुरुंग शोधून त्यांच्यावर आक्रमण करत आहे. त्यामुळे आता इस्रायली सैनिक आणि हमासचे आतंकवादी यांच्यात थेट युद्ध चालू झाले आहे. अशातच हमास त्याच्या अनेक आतंकवाद्यांना इजिप्तमध्ये पाठवत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.

Netanyahu on Hezbollah : हिजबुल्लाने चूक केली, तर त्याला अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता एक मास होत आला असून लेबनॉनची आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायल अन् अमेरिका यांना थेट विनाशाची धमकी दिली.

हमासने केलेल्या भयानक हत्याकांडाच्या विरोधात सर्व जगाने आवाज उठवण्याची आवश्यकता !

सध्या हमासकडून केल्या जाणार्‍या अत्याचारांचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे, अशी स्थिती आहे. हमासने इस्रायल आणि अमेरिकन महिलांवर आक्रमण करणे, त्यांचे अपहरण करणे, शिरच्छेद करणे, जिवंत जाळणे इत्यादी क्रूर अत्याचार केले आहेत. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे.

इस्रायल-हमास युद्धावरून होत असलेले जागतिक ध्रुवीकरण आणि मुसलमानेतरांची स्थिती

पॅलेस्टाईनच्या जिहादी गटांनी इस्रायलच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमण करत ‘अघोषित युद्ध’ चालू केले. हमासच्या आतंकवाद्यांनी ‘केवळ नागरिकांना लक्ष्य केले’, असे नाही, तर अमानुषपणे हत्या करणे, अपहरण आणि बलात्कार करणे इत्यादी क्रूर अपप्रकार केले.

आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

आम्ही गाझा शहरात आधीच प्रवेश केला आहे. आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

रशियाचा वॅगनर गट हिजबुल्लाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवणार !

इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने  उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.

इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य ! – भारत

इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.