सध्या हमासकडून केल्या जाणार्या अत्याचारांचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे, अशी स्थिती आहे. हमासने इस्रायल आणि अमेरिकन महिलांवर आक्रमण करणे, त्यांचे अपहरण करणे, शिरच्छेद करणे, जिवंत जाळणे इत्यादी क्रूर अत्याचार केले आहेत. त्याचा संपूर्ण जगाने निषेध केला पाहिजे.
१. हमासने केलेल्या आक्रमणाविषयी इस्लामी राष्ट्रांनी इस्रायलला दोषी ठरवणे
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना ‘हमास’ने जवळजवळ १ सहस्र २०० निष्पाप ज्यू, इस्रायली आणि अमेरिकन नागरिक यांच्यावर आक्रमण करून त्यांची क्रूरपणे हत्या केली. याखेरीज इस्रायलमधील सहस्रो नागरिक घायाळ झाले. ही घटना पहाताच माझे हृदय पिळवटून गेले. हमासकडून करण्यात आलेल्या या नीच कृत्यांमुळे माझ्यातील मानवता जागृत होऊन मी प्रतिसाद देण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. हे सर्व वास्तवात घडलेले असूनही जवळजवळ सर्व इस्लामी राष्ट्रे या आतंकवादी कृत्यांविषयी इस्रायलला दोषी ठरवण्याची मनाला अस्वस्थ करणारी स्पर्धा करत आहेत. इस्लामी देशांच्या काही गटांशी पाकिस्तानी प्रसिद्धीमाध्यमे ही ज्यू आणि इस्रायली नागरिक यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्या अन् घृणास्पद कृत्ये ही योग्य, तसेच प्रशंसनीय असल्याप्रमाणे त्याविषयी जल्लोष करत आहेत. राजकीय आणि मूलगामी इस्लामचे हे स्वरूप भयावह असून मी कित्येक वर्षे त्याला प्रखरपणे आव्हान देत आहे. अशा प्रकारची धार्मिक वैर ठेवणारी क्रूर संस्कृती ही आता आपण पहात असलेल्या जगातील गोंधळासाठी मूलतः प्रेरक ठरली आहे. अफगाणमधील तालिबान, नायजेरियन बोको हराम, मध्य पूर्वेतील इस्लामी राष्ट्रे, अल् कायदा, लॅबेनॉनमधील हिजबुल्ला आणि पॅलेस्टाईनमधील हमास या इस्लामिक जिहादी गटांमध्ये त्याचे प्रकटीकरण होत आहे.
२. हमासचे क्रौर्य आणि इस्लामी राष्ट्रांकडून आतंकवादाला प्रोत्साहन !
‘अमेरिकन मिलीटरी न्यूज डॉट कॉम’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हमासचे आतंकवादी ओलीस ठेवलेल्या इस्रायली महिला आणि बालके यांची हत्या करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे संगीत महोत्सवात आणि सीमेवरील आतंकवादी आक्रमणे करण्याच्या विरोधात इस्रायलने सूड घेणे साहजिक आहे. आश्चर्याचे म्हणजे अशा निंदनीय आतंकवादी कृत्यांविषयी एकत्रितपणे आवाज उठवण्याऐवजी अनेक इस्लामी राष्ट्रे जेरुसलेमवर वर्चस्व ठेवल्याविषयी इस्रायलवर टीका करत हमासने केलेल्या अत्याचाराविषयी इस्रायलला दोषी ठरवणारी वक्तव्ये करत आहेत. ७ ऑक्टोबर या दिवशी झालेला रक्तपिपासू संहार, तसेच अनेक इस्रायली नागरिकांचे करण्यात आलेले अपहरण यांचा उल्लेख ही इस्लामी राष्ट्रे ‘इस्रायलमधील ९/११ चे आक्रमण’ (अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ या दिवशी आतंकवादी आक्रमण झाले होते. त्याची आठवण इस्रायलवरील या आक्रमणाने होते.) अशा शब्दांत करत आहेत. या भयावह कृत्यांचा परिणाम ज्यू, इस्रायली आणि अमेरिकन नागरिक अन् संपूर्ण जगावर खोलवर झाला आहे. इस्लामी राष्ट्रांकडून केल्या जाणार्या विविध घोषणांमुळे त्यांना ‘आतंकवादाला सहानुभूती देणारे’ किंवा ‘आतंकवादाचे प्रायोजक किंवा पुरस्कर्ते’ म्हणावे, अशी त्यांची प्रतिमा सिद्ध होत आहे आणि त्यामुळे इस्लामच्या नावाला ते काळिमा फासत आहेत. या स्थितीवरून सध्या चालू असलेल्या संघर्षामधील गुंतागुंत आणि ही तीव्र परिस्थिती हाताळण्यासाठी अत्याधुनिक अन् सर्वांगी उपाययोजना करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
३. मध्ययुगातील स्थितीप्रमाणे केले जाणारे अत्याचार !
आतापर्यंतचा इतिहास पहाता मानवाने मानवाशी शत्रूत्व करण्याचे प्रमाण अत्यंत शिखरावर पोचले आहे. यातील एक जुनी पद्धत म्हणजे हत्या केल्या जाणार्यांच्या घशात वितळलेले धातू ओतणे. शास्त्रीय विश्लेषण केल्यानंतर सिद्ध झाले आहे की, वितळलेल्या धातूमुळे हत्या होणार्याच्या शरिरातील अवयव तुटतात. यामुळे व्यक्ती गुदमरल्यामुळे असह्य वेदना होऊन अवघ्या काही मिनिटांत तिचा मृत्यू होण्याची पद्धत पुढे आली, तसेच स्वतःला सभ्य म्हणवणार्या काही घटकांकडून मोठी शिक्षा म्हणून शरिराचे तुकडे करण्याची भयानक पद्धत अवलंबली जात आहे. अशा प्रकारच्या अत्याचारांची सूची ही पुष्कळ मोठी आहे, हे खेदजनक आहे.
४. हमासच्या आतंकवादाची क्रूरता ‘इसिस’पेक्षाही भयानक !
यांपैकी प्रत्येक कृती दुसर्या कृतीपेक्षा ही अनैतिक आणि तिरस्करणीय आहे. हमास आणि इस्रायल यांच्या या युद्धामध्ये हमासच्या आतंकवाद्यांनी शेकडो लोकांचे प्राण घेतले, सहस्रो लोकांना घायाळ केले, तर काहींना ओलीस ठेवले. आता निष्पाप नागरिकांची सार्वजनिकरित्या हत्या करण्याची राक्षसी धमकी ते देत आहेत. त्यांच्यापैकी एक आतंकवादी म्हणतो, ‘‘या क्षणापासून जर निष्पाप नागरिकांना कल्पना न देता लक्ष्य केले, तर आम्हाला ओलीस ठेवलेल्यांपैकी एकाची हत्या करून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित करावी लागेल.’’ इस्रायलच्या लष्कराचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हॅच म्हणाले, ‘‘आतापर्यंत आतंकवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांची संख्या कळलेली नाही. ती जवळपास १०० असावी, असा अंदाज आहे. यात नागरिक, त्यांची लहान मुले आणि वयस्कर लोक यांचा समावेश आहे.’’
हमासच्या आतंकवाद्यांकडून केल्या जाणार्या या हत्यांचा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझेक हॅरजॉग यांनी तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत झालेल्या विध्वंसामध्ये एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यूंच्या हत्या झालेल्या नव्हत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यू महिला, लहान मुले आणि वयस्कर माणसांच्या हत्या अन् त्यातून वाचलेल्यांना ट्रकमध्ये कोंबून ओलीस ठेवण्यासारख्या दृश्यांचे आम्ही साक्षीदार आहोत. हमासने ‘इसिस’ची क्रूरता आयात करून त्याची पुनरावृत्ती केली आहे. सणाच्या दिवशी नागरिकांच्या घरात शिरून थंड रक्ताने त्यांच्या कुटुंबातील लहान मुले आणि वयस्कर यांची हत्या करणे, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करून ते जाळणे अन् हत्या होणार्यांचा क्रूरपणे छळ करणे, हे कुकृत्य त्यांनी केले आहे.’’ सध्या तरी ‘हमासकडून केल्या गेलेल्या आतंकवादाची क्रूरता ही इसिसच्या क्रूरतेपेक्षाही भयानक आहे’, असे म्हटले जात आहे.
५. जागतिक स्तरावरील आतंकवादाचे वाढते संकट न्यून करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक !
सध्याच्या घटना लक्षात घेता हमासकडून केल्या जाणार्या क्रूरतेचे इसिसकडून केल्या जाणार्या क्रूरतेशी साम्य आहे. यामध्ये इस्रायली सैनिकांच्या शिरच्छेदासारखी कुकृत्ये आहेत. हमासची ही कुकृत्ये इस्रायली लष्कराने प्रकाशात आणली आहेत आणि त्याची तीव्रतेने नोंद घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हमासकडून केल्या गेलेल्या या कुकृत्याचा जागतिक स्तरावर निषेध करण्यात आला असून त्यांचे कृत्य अत्यंत क्रूर, अमानवी, घृणास्पद आणि नैतिकता यांच्या दृष्टीने योग्य नाही, असे आहे. यामुळे जागतिक स्तरावरील हे वाढते संकट न्यून करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
हमास हे लढवय्ये आहेत कि आतंकवादी ? त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची चित्रफित पहाता त्यांना आतंकवादीही म्हणता येणार नाही. ते जंगली जनावरे आणि खाटीक आहेत. त्यांनी केलेली कुकृत्ये ही भ्रष्ट, घृणास्पद आणि अवमानापेक्षा खालच्या स्तरावरची आहेत. सर्व जगाने आता जागे होऊन हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या आतंकवादाचा निषेध केला पाहिजे.’
लेखक : सलाहउद्दीन शोएब चौधरी, पत्रकार, बांगलादेश.
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)