मुंबईत मागील वर्षी वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात !

अमेरिकेतील आस्थापनाचा दावा ! गलवान खोर्‍यातील संघर्षाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न ! भारत सरकारने अमेरिकेच्या वृत्तपत्राने केलेला हा दावा खरा कि खोटा, हे पडताळून त्यामागील सत्य समोर आणणे आवश्यक !

संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

संत एकनाथ महाराज यांची शिकवण जगभरात पोचवणार्‍या मिशनचे कार्य अभिनंदनीय आहे. सहस्रो भाविकांनी याचा लाभ करून घेतला आहे, हे कौतुकास्पद आहे. संतांची शिकवणच आदर्श समाज निर्माण करू शकते. यासाठी भाविकांनी याचा अधिकाधिक प्रसार करावा, हीच संतांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता होय.

म्यानमारमध्ये सैन्याच्या गोळीबारात १८ आंदोलक ठार

सैन्याने यांगून, दावेई, मंडाले, मायैक, बागो आणि पोकोकू या शहरांमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला.

अमेरिकेत कोरोनाकाळात चिनी वंशाच्या लोकांवरील आक्रमणांत वाढ !

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आक्रमणे रोखण्यासाठी आदेश

पाकडून १७ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ३ नौकाही जप्त

मासेमार्‍यांना अटक केल्यावर काही मास किंवा काही वर्षे कारागृहात रहावे लागते.

भारत शस्त्रसंधीचे पालन करील, पाकनेही तिचे पालन करावे ! – भारतीय सैन्य

गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्‍वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला मराठी भाषा शिकवावी !

सध्या मी हिंदी भाषा शिकत आहे. यानिमित्ताने मला आदित्य ठाकरे यांनी मराठीही शिकवावी.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

लंडन येथील न्यायालयाने भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांना फटकारले !

न्यायाधीश सॅम गूझी यांनी काटजू यांना फटकारता म्हटले की, या प्रकरणातील काटजू यांची भूमिका आश्‍चर्यकारक, आक्षेपार्ह आणि असंवेदनशील आहे. ‘सरकारने जाणूनबुजून माध्यमांमध्ये या प्रकरणाची राळ उडवली’, ही काटजू यांंची भूमिका आम्ही नाकारत आहोत.

चीनने उघूर तुर्क मुसलमानांशी योग्य व्यवहार करावा !

तुर्कस्तानने सुनावले आणि चीनने व्यवहार सुधारला, असे कधीतरी होईल का ? चीन अमेरिकेला भीक घालत नाही, तेथे तुर्कस्तानला काय महत्त्व देणार ? तुर्कस्तान केवळ जगातील मुसलमानांना, ‘आम्ही मुसलमानांसाठी काही तरी करत आहोत’,  हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे !