हिंदु राष्ट्र घोषित करून मगच सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

एम्. नागेश्वर राव

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते. आंध्रप्रदेशमधील २४ सहस्र ६३२ हिंदु मंदिरे कह्यात घेतली गेली, असे मी मानतो. या सर्व मंदिरांची ४ लाख एकर भूमी शासकीय अधिपत्याखाली आहे. यात १ लाख एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर हे राष्ट्र हिंदु राष्ट्र करावे आणि मग सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी.