मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांची निवेदनाद्वारे मागणी !
इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील अवैध पशूवधगृहांवर कारवाईचा बुलडोझर फिरवून ती भुईसपाट करा, अशी मागणी इंदापूर नगर परिषद आणि इंदापूर तहसीलदार यांच्याकडे मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील कसाई गल्लीतील अवैध पशूवधगृहांवर २३ नोव्हेंबर या दिवशी धाडसी कारवाई केली होती. त्याचे नागरिकांनी स्वागत केले, तसेच नगर परिषदेचे कौतुक केले होते. त्यानंतर २० जानेवारी आणि २३ फेब्रुवारी या दिवशी इंदापूर पोलिसांकडून टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले होते. या दोन्ही वेळेस इंदापूर पोलिसांकडे गुन्हा नोंद केला होता. यावरून नगर परिषदेने भुईसपाट केलेल्या, तसेच काही तांत्रिक कारणांमुळे कारवाईपासून वंचित राहिलेल्या अवैध पशूवधगृहातून आजही गायींच्या कत्तली होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अवैधरित्या चालू असलेल्या पशूवधगृहांवर बुलडोझर फिरवून पशूवधगृहे भुईसपाट करावेत, अशी लेखी मागणी केली आहे.
गोरक्षणाच्या कार्याची दखल घेणाऱ्या ” दै. पुढारी ” चे मन:पूर्वक आभार ! { आज दि. १४.२.२३ }
आपला नम्र
शिवशंकर स्वामी #cow #बैल #इंदापूर #bulak #Indapur #cows #गाय #गोहत्या #पुढारी #Pudhari @Dev_Fadnavis @mieknathshinde @narendramodi @AmitShah pic.twitter.com/w68uP5Xzic— Shivshankar Swami (@shivshankar7593) February 14, 2023
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई करू शकत नाही का ? ज्या महाराष्ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्ध्वस्त करण्याची मागणी करण्यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्जास्पद आहे ! |