ध्वनीप्रदूषणामुळे पर्यटनावर विपरित परिणाम ! – प्रदूषण नियंत्रण मंडळ

पणजी, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच झालेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात ध्वनीप्रदूषण केल्यावरून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंडळातील सदस्यांनी ध्वनीप्रदूषणामुळे पर्यटनावर विपरित परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले.

१. कार्यक्रमांचे आयोजक, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि पोलीस यांच्यामध्ये ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात जागृती केली पाहिजे, याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाची चर्चा झाली.

२. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शमिला मोन्सेरो म्हणाल्या की, राज्यात एकूण १२ ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जाणार आहेत. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी ४ व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मंडळाचे सदस्य पोलिसांना सहकार्य करणार आहेत.

संपादकीय भूमिका

उपाययोजना काढण्यासह प्रशासनाने त्याची कठोर कार्यवाही करणे जनतेला अपेक्षित !