कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात उपचारास अनुमती

शहरी नक्षलवादी यांची प्रकृती बिघडल्याने १५ दिवस उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात भरती

गोमातेच्या रक्षणासाठी शासनाचे सहकार्य असेल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.

सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू 

सिंधुदुर्गात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ९० झाली आहे.

मंदिरांनंतर आता गड, किल्ले यांची दारे उघडली

दुर्ग आणि किल्ले सर्वांसाठी खुले.

गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात ४ मृत्यू, तर १५४ नवीन कोरोनाबाधित

कोरोना रुग्णात कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे नव्हती.

महाराष्ट्रातील औषध पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत

सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे

प्रतिदिन १ अंडे खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो ! – संशोधकांचा  निष्कर्ष

प्रतिदिन १ अंडे खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. शास्त्रज्ञांनी ८ सहस्र ५४५ चिनी युवकांवर केलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. याआधीच्या संशोधनात प्रतिदिन अंडे खाल्ल्यामुळे मधुमेह होत नसल्याचा दावा करण्यात आला होता.

कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविक रांगेत

तब्बल ८ मासांनी मंदिरे उघडल्याचा अपार उत्साह भाविकांमध्ये दिसून येत आहे.

आयुर्वेद आणि भारताचे दायित्व

ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !