‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करा ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
मुसलमान प्रत्येक उत्पादक आणि आस्थापन यांच्याकडे हेतूपुरस्सर मागणी करून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास भाग पाडत आहेत. ‘हलाल प्रमाणपत्र’ अन्न व औषध प्रशासनाकडून नाही, तर ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेकडून घ्यावे लागते. हिंदूंचा व्यापार आणि व्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे.