विज्ञानवाद्यांचे पोरखेळासारखे संशोधन !

‘पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे ज्ञान देणारे सूक्ष्मातील काहीतरी आहे, हे ज्ञात नसल्याने विज्ञानवाद्यांचे संशोधन पोरखेळासारखे असते !’

चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग !

ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती अन् सोने समान आहे, तो योगीयुक्त, म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

बुद्धीप्रामाण्यवादी अर्थात्‌ धर्मद्रोही !

धर्म बुद्धीच्या पलीकडे असल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्म समजून न घेता धर्मावर टीका करणे, हा धर्मद्रोहच आहे.

निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले हे हिंदूंचे खरे कैवारी आहेत ! – श्री. राजेंद्र परुळेकर, धर्मप्रेमी, विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.

प.पू. डॉ. आठवले यांनी माझे नाव लक्षात ठेवून मला प्रसाद पाठवला. केवढा हा प्रेमभाव ! त्यांचे हे निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे आज सहस्रो हिंदू त्यांच्याशी जोडले गेले आहेत अन् धर्मप्रसाराची सेवा ‘गुरुकार्य’ म्हणून निरपेक्ष भावनेने करत आहेत.

हिंदूंचा कल्पनेपलीकडील सर्वधर्मसमभाव !

‘विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची ‘रावण महाराज’ या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कुणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !’

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. मीरा राकेश परचुलकर (वय १४ वर्षे) !

‘शाळेतील विद्यार्थिनींचे वागणे आणि बोलणे यांत शिस्त नाही’, हे मीराच्या लक्षात येते. ‘गुरुकृपेने मला ‘संस्कारवर्ग,  दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ इत्यादींमधून योग्य कृती कशा कराव्यात ?’, हे समजते’,

पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी, हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने साधनेचे प्रयत्न होत असल्याबद्दल रत्नागिरी येथील आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘सप्टेंबर २०२२ पासून भगवंताच्या कृपेने माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक आणि दायित्व साधक यांच्या दिशादर्शनामुळे काही व्यष्टी अन् समष्टी साधनेचे विविध पैलू माझ्या लक्षात येऊन माझ्याकडून साधनेचे झालेले प्रयत्न मी श्री गुरुचरणी अर्पण करते.

बुद्धीप्रामाण्यवादी खरंच “बुद्धीप्रामाण्यवादी” आहेत ?

‘त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ?’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे दिले आहे.