निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले हे हिंदूंचे खरे कैवारी आहेत ! – श्री. राजेंद्र परुळेकर, धर्मप्रेमी, विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला अनुपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनाही आठवणीने प्रसाद पाठवणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी धर्मप्रेमींनी दिलेला अभिप्राय !

श्री. राजेंद्र परुळेकर

‘वर्ष २०२३ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’नंतर विष्णुस्वरूप गुरुमाऊलींनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) विजयदुर्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प्रतिष्ठित धर्मप्रेमी श्री. राजेंद्र परुळेकर यांच्यासाठी प्रसाद पाठवला. सहसाधक श्री. अशोक करंगुटकर यांच्या समवेत मी त्या धर्मप्रेमींच्या घरी गेलो आणि त्यांना तो प्रसाद दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुंबई येथील मित्रांसमोर पुढील अभिप्राय दिला.

आधुनिक वैद्य रविकांत नारकर

ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती किती परिपूर्ण आहे !’, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मला गोवा येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आमंत्रण देण्यात आले होते; पण काही अडचणीमुळे त्या ठिकाणी गेलो नसतांनासुद्धा प.पू. डॉ. आठवले यांनी माझे नाव (प्रसादाच्या खोक्यावर लिहिलेले आपले नाव मित्राला दाखवत) लक्षात ठेवून मला प्रसाद पाठवला. केवढा हा प्रेमभाव ! त्यांचे हे निरपेक्ष प्रेम आणि त्यागी वृत्ती यांमुळे आज सहस्रो हिंदू त्यांच्याशी जोडले गेले आहेत अन् धर्मप्रसाराची सेवा ‘गुरुकार्य’ म्हणून निरपेक्ष भावनेने करत आहेत. ते हिंदूंचे खरे कैवारी आहेत. अधिवेशनाला अगत्याचे आमंत्रण असूनही मी तेथे न गेल्याबद्दल मला खरोखरच खंत वाटते. पुढच्या वर्षीच्या अधिवेशनाला जाण्यासाठी मी नियोजन करून प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

धर्मप्रेमींचा हा अभिप्राय ऐकून आमचा भाव जागृत झाला. त्यामुळे आमचा सेवेतील आनंदही बराच काळ टिकून होता.’

– आधुनिक वैद्य रविकांत गोविंद नारकर (वय ६५ वर्षे), पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (३०.६.२०२३)