उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मीरा परचुलकर ही या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. मीरा राकेश परचुलकर हिची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के आहे.’ – संकलक)
ज्येष्ठ शुक्ल द्वादशी (१९.६.२०२४) या दिवशीकु. मीरा राकेश परचुलकर हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
कु. मीरा परचुलकर हिला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नामजप एकाग्रतेने करणे
‘कु. मीरा नामजप करायला बसते, तेव्हा डोळे बंद केलेली तिची मुद्रा ही ध्यान लावल्यासारखी दिसते. नामजप करतांना ती वेळ बघण्यासाठी सतत डोळे उघडून घड्याळ पहात नाही.
२. सात्त्विकतेची ओढ
एकदा दादर, मुंबई येथे दिंडीचे आयोजन केले होते. तेव्हा ‘सर्व साधक आणि बालसाधक एकत्र भेटणार’, याचा मीराला आनंद झाला. ‘प्रत्यक्ष दिंडीच्या वेळी दिंडीतील चैतन्यामुळे तेथील वातावरणाची शुद्धी होत आहे’, असे मीराला वाटले.
३. कृतज्ञताभाव
अ. दिंडीतील बालसाधकांच्या वेगवेगळ्या सात्त्विक वेशभूषा पाहून तिने गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
आ. ‘शाळेतील विद्यार्थिनींचे वागणे आणि बोलणे यांत शिस्त नाही’, हे मीराच्या लक्षात येते. ‘गुरुकृपेने मला ‘संस्कारवर्ग, दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ इत्यादींमधून योग्य कृती कशा कराव्यात ?’, हे समजते’, या विचाराने ती कृतज्ञता व्यक्त करते.
इ. एकदा रात्री मीराचा कान पुष्कळ दुखत होता. घरात कान दुखणे न्यून करण्यावरचे औषध नव्हते. मी तिच्यावर बिंदूदाबनाचे उपाय केले आणि दुखणे न्यून होण्यासाठी गोळी दिली. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी तिचा कान दुखायचा थांबला. तेव्हा ‘गुरुदेवांनी साधकांसाठी किती उपयुक्त ग्रंथ लिहिले आहेत’, या विचाराने तिला कृतज्ञता वाटली.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
अ. मे २०२३ मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी गोवा येथे जायचे आहे’, असे कळल्यावर मीराला आनंद झाला. ‘गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन होणार’, या विचाराने तिचा भाव जागृत झाला होता. सोहळ्याला जातांना ती सतत नामजप करत होती. प्रत्यक्ष सोहळा पहातांना तिची भावजागृती झाली. सोहळा झाल्यावर ‘गुरुदेवांचे दर्शन झाले’, यासाठी ती कृतज्ञता व्यक्त करत होती.
आ. मे २०२४ च्या प.पू. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) वाढदिवसाच्या दिवशी महर्षींनी साधकांना गुरुदेवांची मानसपूजा करायला सांगितली होती. तेव्हा मीराने सूक्ष्मातून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन गुरुदेवांची भावपूर्ण मानसपूजा केली.
इ. ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव’ हा विशेष भक्तीसत्संग मीराने पूर्ण ऐकला. मीराला असे विशेष सत्संग ऐकायला आवडतात.
५. मीराचे स्वभावदोष
इतरांशी वागण्या-बोलण्यात नम्रता नसते, ती घरात कुणाशीच संवाद साधत नाही. तिला कुठलेही काम करायला सांगितल्यावर ती ते लगेच करत नाही. ती भ्रमणभाष (मोबाईल), भ्रमणसंगणक (लॅपटॉप) पहाण्यात वेळ घालवते.
‘गुरुदेवांच्या कृपेने मीरा आम्हाला मुलगी म्हणून लाभली आणि तिच्या माध्यमातून माझीही साधना होत आहे’, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. मनाली परचुलकर (मीराची आई), बदलापूर, जिल्हा ठाणे. (२.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.