१३ डिसेंबर २०२१ या दिवशी नगर येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…
वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल; पण आपण ते कसे मान्य कराल ? पुरोगाम्यांच्या आणि नेहरूवाद्यांच्या राजकीय संघटना अन् त्यांचे कार्य केवळ सत्तेकरता आणि स्वार्थाकरता आहे. सत्ता हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताची समाजरचना अभ्यासली गेली का ? प्राचीन समाज रचनाशास्त्रांचा हिंदु समाजाला भक्कम आधार आहे. त्याची उपेक्षा करू नका. कमरेचे कापड डोक्याला गुंडाळू नका. आतातरी हिंदूंनी अंतर्मुख होऊन विचार करावा. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठातील (‘युनिव्हर्सिटी’तील) पाठ्यपुस्तके आणि अभ्यास पुस्तकांतून ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हद्दपार करून ‘आर्य हेच या भूमीचे अधिपती, ते इथलेच, आर्य ऋषींनीच ही भारतभूमी तपस्येतून निर्मिली’, असा प्रस्थापित सिद्धांत मांडला, शिकवला आणि सांगितला, तरच हिंदूंना तरणोपाय आहे. अन्यथा हिंदूंसारखे करंटे हिंदूच !
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२१)