चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि पंजाब या ५ राज्यांत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘शासन जे गर्भपात, कुटुंबनियोजन (birth control) इत्यादींचा अंगीकार करत आहे, तो अधर्म आहे. जिथे जनतंत्र (लोकशाही), सार्वत्रिक मतदान आहे, तिथे लोकसंख्या वृद्धीला महत्त्व येईल. संख्यावृद्धीकरता धर्म लाथाडून संस्कृतीची अवहेलना करणे, हा सर्वनाश आहे. पातिव्रत्य, एकपत्नीव्रत, ब्रह्मचर्य यांचाही महिमा आहे. कुलशुद्धी, वर्णशुद्धीनेच महापुरुष जन्मजात घडवले जातात. लक्षावघी शेळ्यामेंढ्यांपेक्षा एकच सिंह परमश्रेष्ठ आहे. त्याकरता आजच्या घटनेचा अभ्यास करून नवीन घटना, जी भारतीय मातीची असेल, ती घडवली पाहिजे. चारित्र्य, गुण, आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील,  अशीच निवडणूकपद्धती, अशाच मतदार आणि उमेदवार यांकरता शर्ती असल्या पाहिजेत.

‘स्वातंत्र्य कशाकरता हवे ? धर्मजीवनाकरताच ना ! जिथे धर्मजीवनावरच आघात होऊन धर्मसंस्कृती नष्ट होत असेल, ते स्वराज्य नव्हे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य शून्य आहे.’ गाढव बनण्याच्या शर्तीवर जर सिंहाला स्वातंत्र्य देऊ केले, स्वतंत्र होऊन जर त्याला गाढव बनावे लागत असेल, तर त्या स्वातंत्र्यापेक्षा कोठडीतल्या पिंजर्‍यात कारावास पत्करून जातीवंत सिंह राहूनच जीवन व्यतित करणे श्रेयस्कर नाही का ? लक्षावधी शेळ्यामेंढ्यांपेक्षा एकच सिंह पुरवला. ‘वर्णसंकर, रक्तसंकर करून शेळ्यामेंढ्यांची संख्यावृद्धी करणे म्हणजे राष्ट्रनाश आहे’, असे व्यास सांगतात, मनु सांगतो आणि कौटिल्यही सांगतात.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८.५.२००९)