सर्वच क्षेत्रांत प्रगतीची अत्युच्च शिखरे गाठलेली भारतातील वैदिक राज्ये !

टीका – युरोपातल्या प्रबोधनयुगात बुद्धीप्रामाण्य होते.

खंडण – शास्त्रार्थ, कला आणि अध्यात्म या सर्वच क्षेत्रांत प्रगतीची अत्युच्च शिखरे गाठलेली भारतातील वैदिक राज्ये ! : युरोपातल्या प्रबोधनयुगात बुद्धीप्रामाण्य होते ! मग भारतीय सनातन्यांनी आपल्या बुद्धीची दारे कुलूप लावून बंद केली होती का ? वेगवेगळे धर्म, संप्रदाय आणि पंडित यांचे बौद्धिक वादविवाद अथवा शास्त्रार्थ होत नव्हता का ? इतके महान ग्रंथ जेथे निर्माण झाले, ते बुद्धीच्या प्रगल्भतेविना झाले का ?

शरिराला सोडून असणारा जीव वा आत्मा म्हणून कुणीच नाही इत्यादी विषयी भारतातील सामान्यांना शंका येत असल्यामुळेच प्राचीन ऋषींनी स्पष्टीकरणार्थ त्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत.

भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या आजच्या तमाम बुद्धीवाद्यांनो, अक्षपाद गौतम आणि कणाद यांचे ग्रंथ पहा ! त्यातले काय समजते, ते सांगा. त्यांनी दिलेली उत्तरे अजूनपर्यंत एकाही आधुनिकाला देता आलेली नाहीत. जगामध्ये केवळ युरोपियनांमध्येच बुद्धीप्रामाण्य होते, असे या टीकाकारांना दर्शवायचे आहे. प्राचीन भारतीय ऋषींच्या बुद्धीची झेप युरोपियनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, हे गौतम आणि कणाद यांच्या उदाहरणांवरून दिसून येते. युरोपियनांनी व्यक्त केलेले हे मत केवळ स्वतःच्या बुद्धीविषयीच्या अहंगडतेतून केलेले दिसते. पाश्चात्त्यांनी ही वस्तूस्थिती प्रांजळपणे मान्य केली आहे. ‘Atomism and Indian Logic’ चा लेखक कीथ (Keith) हा तसे स्वच्छ मान्य करतो. इथे बुद्धीवादी नव्हते का ? बुद्धीस्वातंत्र्य नव्हते का ? महाराष्ट्रात शातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव अशी ज्ञानेश्वर काळापर्यंतची वैदिक राज्ये होती. त्या राज्यांत बुद्धीवाद नव्हता का ? कला, शास्त्रे झाली नव्हती का ?’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’, २६.५.२०११)