धार्मिक कृतींचे ज्ञान आणि आत्‍मज्ञानातील अंतर

धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्‍यांचे कार्य शेष असते, तर आत्‍मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्‍मज्ञानाचे फळ आहे. पुन्‍हा पुन्‍हा  काही करावे लागत नाही.

साधकांनी प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांच्या समवेत अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे आणि त्याचा आढावा देणे आवश्यक !

साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’

मोक्षप्राप्ती एकट्याने आणि एकट्यालाच होते !

आरंभिक साधनेनंतर पुढे प्रगतीसाठी व्यक्तिगत प्रयत्न अत्यावश्यक असतात. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न अगदी एकट्यानेच करावे लागतात आणि मोक्षप्राप्ती केवळ त्या एकट्यालाच होते.

भक्‍ती असो वा ज्ञान, ईश्‍वर असे अधिष्‍ठान

ईश्‍वरावरील श्रद्धा आणि विश्‍वासामुळे भक्‍त आपल्‍या आध्‍यात्मिक प्रगतीचा भार ईश्‍वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्‍य आपला आत्‍मा हा ज्ञानमय चैतन्‍यरूपी ईश्‍वराचाच अंश आहे हे जाणून आत्‍मबळाने आध्‍यात्मिक प्रगती करतो. दोघेही ईश्‍वराच्‍या आधारावरच प्रगती करतात.

व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रतिदिन न्‍यूनतम १ घंटा देण्‍याचा संकल्‍प करावा ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

वाराणसीमध्‍ये नुकत्‍याच पार पडलेल्‍या प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनामध्‍ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्‍ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्‍यांनी त्‍यांच्‍या गावामध्‍ये या सभेचे आयोजन केले होते.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे मला म्‍हणाले, ‘‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍यासाठी प्रथम आपली दृष्‍टी तशी बनवणे आवश्‍यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्‍यादी.

पाशवी वक्फ कायदा रहित करण्याची संघटित होऊन मागणी करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

संन्यासी भगवंताच्या स्मरणात जीवन व्यतीत करण्यासाठी घरादाराचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात रहातो.