सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
श्री. शिवप्रसाद कब्बुरे : आता आश्रमात आल्यापासून मी आनंदी आहे. पूर्वी घरी असतांना माझ्या मनात भविष्याचा विचार असायचा, तसेच मनावर ताण असायचा; पण आता मला स्थिर आणि वर्तमानकाळात रहाता येते, म्हणजे मनात पुढचा विचार येत नाही. मी सर्व तुमच्यावर सोपवले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मुख्य आनंद आहे ना ! याऐवजी समाजातील लोकांना आनंद मिळत नसला, तर ते मनोविकार तज्ञांकडे जातात. आता आपल्याला सगळ्या जगाला शिकवावे लागेल की, साधनेनेच मनातील अनावश्यक विचार न्यून होतात आणि आनंद मिळतो. हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहात.