यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. संदीप आळशी

‘माझे यजमान श्री. मिलिंद यांना रात्री झोपेतून जाग येत असे आणि त्यानंतर त्यांना रात्रभर झोप लागत नसे. ३०.५.२०२३ या दिवशी सकाळी उठल्यावर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘माझ्या यजमानांना काहीतरी त्रास होत आहे; परंतु मला तो समजत नाही. आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग दाखवा.’ त्यानंतर दुपारी रामनाथी आश्रमात मला सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी भेटले आणि त्यांनी माझ्याकडे श्री. मिलिंद यांना होणार्‍या मूळव्याधीच्या त्रासाविषयी विचारपूस केली.

श्री. मिलिंद कुलकर्णी

तेव्हा मी यजमानांना होणार्‍या झोपेच्या त्रासाविषयी सांगितले. त्या वेळी पू. संदीपदादा म्हणाले, ‘‘योग्य ठिकाणी बसून नामजप केला पाहिजे आणि तो जप आत गेला पाहिजे. त्यासाठी संत साधकांसाठी ज्या वेळी नामजप करतात, त्या वेळी उपायांना बसावे. सकाळी ११ ते १२ आणि संध्याकाळी ५.४५ ते ६.१५ या वेळात जपाला बसल्यास बरे वाटेल.’’

अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले. २२.६.२०२३ या दिवशी पू. दादांनीही सांगितले, ‘‘आता श्री. मिलिंद यांचा चेहरा चांगला वाटतो. त्यांचा त्रास न्यून झाला आहे.’’ त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक