सद्गुरु स्वाती खाडये यांच्या बोलण्यातील गोडवा आणि प्रीती यांमुळे रामनगर (जिल्हा बेळगाव) येथील साधकांमध्ये जाणवलेले पालट !

‘पूर्वी रामनगर येथील साधकांची व्यष्टी साधना होत नव्हती. साधक ताण घेऊन सेवा करायचे. काही साधक सेवेसाठी वेळच देत नव्हते.

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी रामनगर येथील साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर साधकांमध्ये जाणवलेले पालट !

सद्गुरु स्वाती खाडये

मागील वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु स्वाती खाडये यांनी) रामनगर येथे प्रत्यक्ष येऊन सर्व साधकांना मार्गदर्शन केले. तेव्हापासून साधक साधनेचे चांगले प्रयत्न करू लागले आहेत.

१ अ. साधकांची व्यष्टी साधना थोड्या प्रमाणात चालू झाली.

पू. शंकर गुंजेकर

१ आ. साधकांनी ताण न घेता आनंदाने सेवा करणे : साधक ताण न घेता सेवा करू लागले, उदा. दीपावलीच्या आधी आकाशकंदिल वितरणाची सेवा असायची. साधकांना पूर्वी ५० आकाशकंदिलांचे वितरण करायचाही ताण असायचा; पण मागील वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) साधकांनी २०० आकाशकंदिलांचे आनंदाने वितरण केले.

१ इ. गुरुपौर्णिमेसाठी उपस्थिती पुष्कळ वाढणे : पूर्वी गुरुपौर्णिमेसाठी साधकांच्या कुटुंबियांसह १०० ते १२५ उपस्थिती असायची. मागील वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी प्रचार केल्यावर ४०० हून अधिक उपस्थिती होती.

१ ई. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाणीमधील गोडवा आणि प्रीती यांमुळे साधक त्यांच्या बोलण्याकडे आकृष्ट होणे : साधक त्यांच्या समस्या आणि मनातील विचार ‘मुलाने आईला सांगावे’, अशा प्रकारे सद्गुरु स्वातीताईंना सांगतात आणि सद्गुरु स्वातीताईही प्रेमाने त्यांच्या समस्यांचे निवारण करतात.

१ उ. साधक थोडी का होईना; पण व्यष्टी आणि समष्टी साधना भावाच्या स्तरावर करू लागले आहेत.

१ ऊ. काही साधक पूर्णवेळ साधना करण्यासाठी सिद्ध होणे : सद्गुरु स्वातीताईंनी रामनगर येथे येऊन साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर रामनगर येथील ४ साधक रामनाथी आश्रमामध्ये साधना करायला गेले आणि २ साधक काही दिवसांमध्ये साधना करण्याचे नियोजन करत आहेत.

‘हे सर्व गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन यांमुळे साध्य झाले’, यासाठी गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) शंकर गुंजेकर (सनातनचे ५६ वे (समष्टी) संत), रामनगर (जिल्हा बेळगाव) (१३.३.२०२४)


सौ. अर्चना घनवट

गुरुपौर्णिमेला सौ. अर्चना घनवट मार्गदर्शन करत असतांना त्यांच्या आवाजात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येणे

‘मागील वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सौ. अर्चना घनवट यांनी वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. गुरुदेवांच्या कृपेने ते फारच सुंदर झाले. कार्यक्रम संपला, तरी लोक उठत नव्हते. लोकांनी पुष्कळ चांगला प्रतिसाद दिला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मी प्रार्थना केली होती, ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडू दे. वक्त्यांचे भाषण चांगले होऊ दे.’ सौ. अर्चना घनवट साधकांना मार्गदर्शन करत असतांना त्यांच्या आवाजात मला २ वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा आवाज ऐकू आला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘गुरुकृपेने आजचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडणारच आहे.’

– (पू.) शंकर गुंजेकर (१३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक