गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तळमळीने साधना करणार्‍या सौ. जान्हवी अभिजीत विभूते !

‘चैत्र शुक्ल षष्ठी (३.४.२०२५) या दिवशी सौ. जान्हवी अभिजीत विभूते यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. जान्हवी विभूते

सौ. जान्हवी विभूते यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. साधना करण्याची तळमळ

श्री. अभिजीत विभूते

तिला लग्नासाठी श्रीमंत तरुणांची स्थळे आली होती. तिला सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायची होती. त्यामुळे तिने तिला साधना करण्यासाठी अनुमती न देणार्‍या स्थळांना नकार दिला.

२. समाधानी वृत्ती

आमच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. तिने माझ्याकडे कधीही अलंकार घेण्यासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी हट्ट केला नाही. ती प्रत्येक परिस्थितीत समाधानी असते.

३. साधनेचे गांभीर्य

ती स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंर्तगत नियमित सारणीलिखाण करते आणि माझ्याकडूनही करून घेते. ती शारीरिक त्रासावर मात करून सेवारत रहाते.

४. पूर्णवेळ साधना करण्याचा केलेला निश्चय

तिने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. आरंभी तिला ‘हे शक्य होईल ना ?’, असे वाटत होते. तिच्या मनाचा संघर्ष होत होता; मात्र गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तिने त्यावर मात केली. स्त्रियांना सुखसोयी देणार्‍या वस्तू, उदा. दूरचित्रवाणी संच (टीव्ही), शीतकपाट आणि भांडी इत्यादी प्रिय असतात. ‘या सर्व वस्तूंत पुन्हा मन अडकून साधनेचा वेळ व्यर्थ जायला नको’, यासाठी जान्हवीने मला या सर्व वस्तू विकायला लावल्या. जान्हवी क्षणिक सुखाच्या मागे न लागता शाश्वत आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. ‘मला अशी साधकपत्नी लाभली’, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.’

– श्री. अभिजीत विभूते (सौ. जान्हवी यांचे यजमान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.३.२०२५)