कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले मध्यप्रदेश येथे सेवारत असलेले श्री. हेमंत जुवेकर (वय ६८ वर्षे) !

उद्या ‘६.४.२०२५ (चैत्र शुक्ल नवमी, श्रीरामनवमी) या दिवशी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सेवारत असलेले श्री. हेमंत जुवेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

श्री. हेमंत जुवेकर यांना ६८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !

श्री. हेमंत जुवेकर

१. साधनेची ओढ 

पूर्वी श्री. जुवेकरकाका आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राची जुवेकर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे) अधिकोषात नोकरी करत होते. वर्ष २००० मध्ये त्या दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासून ते पूर्णवेळ साधना करत आहेत. सौ. प्राची जुवेकर वाराणसी आश्रमात आणि काका उज्जैन येथील सेवाकेंद्रात रहातात. त्यांचा मुलगा श्री. प्रशांत जुवेकर आणि सून सौ. क्षिप्रा जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४१ वर्षे) हे जळगाव सेवाकेंद्रात राहून साधना करतात.

२. स्वीकारण्याची वृत्ती 

श्री. प्रणव मणेरीकर

काकांना उज्जैन सेवाकेंद्रात अनेक वेळा एकटे रहावे लागते. ते वयस्कर असूनही त्यांना ‘एखाद्या साधकाने त्यांच्या समवेत सेवाकेंद्रात रहायला हवे किंवा स्वयंपाक करायला साहाय्य हवे’, असे वाटत नाही. ते परिस्थिती स्वीकारून सेवाकेंद्राची स्वच्छता आणि अन्य सेवा आनंदाने करतात.

३. सेवेची तळमळ

अ. काकांचे ‘हर्निया’चे (टीप) शस्त्रकर्म झाले आहे, तसेच त्यांना ‘पॅरालिसिस’चा (अर्धांगवायूचा) झटका येऊन गेला आहे, तरीही ते उत्साहाने आणि चिकाटीने सेवाकेंद्रातील अन् प्रसाराची सेवा करतात. (टीप : ‘पोटातील आतड्यासारख्या अवयवाचा काही भाग स्नायू आणि त्वचा यांच्या मधल्या भागात पोटाच्या स्नायूंच्या भिंतींमधून बाहेर येणे’, याला ‘अंतर्गळ’ किंवा इंग्रजीत ‘हर्निया’ म्हणतात.)

आ. त्यांनी समाजातील अनेक व्यक्तींना संस्थेच्या कार्याशी जोडले आहे. काका समाजातील जिज्ञासू व्यक्ती, मित्र, अधिकोषातील पूर्वीचे सहकारी, तसेच नातेवाईक यांच्याकडून गुरुपौर्णिमा आणि अन्य कार्यक्रम यानिमित्त धनस्वरूपात त्याग करून घेतात.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला श्री. जुवेकरकाकांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४५ वर्षे), उज्जैन, मध्यप्रदेश. (२८.३.२०२५)