गोवा : बेतकी, बोरी येथील इस्कॉनच्या भक्तांवरील आक्रमणाचा भजनाद्वारे निषेध

या प्रकल्पात गोशाळा, रेन हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण्याचा) प्रकल्प केला जाईल. निसर्गाची कोणतीही हानी केली जाणार नाही, उलट औषधी झाडे आणि इतर झाडे लावण्यात येतील. हा प्रकल्प बोरीच्या लोकांच्या विरोधात नाही.

गोव्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या चर्चने गोमंतकियांची क्षमा मागावी !

सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्‍या खांद्याला खांदा लावून गोव्‍यातील धर्मांतरित नवख्रिस्‍ती आणि हिंदूंना ‘इन्‍क्‍विझिशन’द्वारे (धर्माच्‍छळाद्वारे) जिवंत जाळण्‍यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्‍याच्‍या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..

गोवा : सोनसोडोवरून येणारे कचरावाहू ट्रक पिळर्ण येथे रोखले

हे ट्रक कचरा वाहून नेत असतांना त्याच्यातून घाण पाणी रस्त्यावर सांडत होते. ही गोष्ट पिळर्ण येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्रक अडवले.

बाणस्तारी (गोवा) येथील भीषण अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक साहाय्य

रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज गाडीच्या मद्यधुंद असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.

गोवा : खाण क्षेत्रातील गावांतील नागरिकांची पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी

नागरिकांना अंधारात ठेवून खाण व्यवसाय रेटला जात आहे. गेल्या ५० वर्षांत खाणींमुळे सुपीक भूमी आणि जलस्रोत नष्ट झाले. त्यामुळे पुढील ५० वर्षांत आणखी किती हानी होईल ?, याची कल्पनाच करू शकत नाही.

गोवा : मद्यालयांच्या बाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करणार !

पोलीस असे किती दिवस मद्यालयांच्या बाहेर उभे रहाणार ? त्यापेक्षा लोकांनी मद्यपान करू नये, यासाठी समाजाला साधना शिकवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांची पुढाकार घ्यायला हवा !

गोवा : मडगाव येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री 

ध्वजसंहितेचे उल्लंघन करून उघडपणे होणारी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री न रोखणारे निष्क्रीय पोलीस आणि प्रशासन !  

पणजी येथे उद्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’चे आयोजन

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याच्या मागणीवरून ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना पणजी येथे शनिवार, १२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !

गोवा : मूर्तीकारांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याची अनेक आमदारांची विधानसभेत मागणी

आमदार जीत आरोलकर यांनी त्यांचे सूत्र मांडतांना सरकारने चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या पारंपरिक मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे आणि प्रतिमूर्ती अनुदान वाढवावे, अशा मागण्या केल्या.

गोवा : अट्टल चोराला चोरीसाठी साहाय्य करणारा दक्षिण गोव्यातील पोलीस हवालदार निलंबित

रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ?