कला अकादमीच्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला : आय.आय.टी.चा अहवाल !

राज्याचे मुख्य अभियंता, आय.आय.टी. मुंबई आणि त्यानंतर आय.आय.टी. देहली यांनी दिलेल्या अहवालात ‘हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्यामुळे ‘स्लॅब’ कोसळला’, असे कारण दिले आहे.

 मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी आज उच्च न्यायालयात सुनावणी

सरकार आणि ठेकेदार आस्थापनाने न्यायालयासमोर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात अनेक वेळा दिनांक दिल्या; पण त्या दिनांकांना अद्याप काम पूर्ण झालेले नाही.

कळंगुट (गोवा) येथील क्लबमधील युवतीने तिच्याशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या थोबाडीत मारले !

जनतेचे रक्षक कि भक्षक पोलीस ? क्लबमध्ये जाऊन युवतीशी गैरवर्तन करणार्‍या पोलिसांकडून सामान्य युवती आणि महिला यांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?

गोवा : खनिज मालाच्या दर्जाच्या निश्चितीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले !

खनिज मालाचा दर्जा आणि प्रमाण निश्चित करण्यासाठी सरकारने स्वतंत्रपणे तपासणी न करता मागील ‘लीज’धारकांनी पूर्वी सुपुर्द केलेल्या ‘खनिज योजना’ यांचा आधार घेतला आहे. यामुळे विरोधकांनी सरकाला धारेवर धरले.

गोवा शासन केंद्राकडे ध्वनीप्रदूषण नियमात शिथिलता देण्याची मागणी करणार !

ही शिथिलता घेतांना किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे संगीत वाजवले जाणार नाही, हे पहावे !

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या दुरवस्‍थेविरोधात बोंबाबोंब आंदोलन !

या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्‍हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्‍याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्‍यात आले.

गोवा : शिवोली येथील अनधिकृत ‘मुस्कान चिकन-मटण’ विक्री केंद्र बंद !

‘‘या परिसरात गुरे गायब होत आहेत आणि यामागे या केंद्राचा हात असल्याचा संशय आहे. दुकानावर ठेवण्यात येत असलेल्या मांसामुळे येथून ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. केंद्रातील मांसाहारी कचराही उघड्यावर टाकण्यात येत आहे.’’

बाणस्तारी अपघाताच्या प्रकरणी चालक महिला होती आणि तिच्यावर गुन्हा नोंदवा !

बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताच्या वेळी एकूण ६ वाहनांना ठोकर देणारे आणि तिघांचा बळी घेणारे ‘मर्सिडीस’ वाहन महिला चालवत होती, अशी लेखी माहिती अपघाताचे पहिले प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलींगकर यांनी म्हार्दाेळ पोलिसांना लेखी स्वरूपात दिली आहे.

म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र झाल्यास ‘तमनार’ प्रकल्प अडचणीत येऊ शकतो ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा

काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी असे सांगितले.

गोवा : ‘तमनार’ वीजप्रकल्प रहित करण्याच्या मागणीसाठी सरकारवर विरोधकांचा दबाव

‘‘प्रकल्पासाठी करण्यात आलेले काम वाया जाणार नाही. नियोजित भागातून वीजवाहिन्या गोव्यात आणण्यास कर्नाटक अपयशी ठरल्यास कोल्हापूर येथून वीज घेण्याची सरकारची सिद्धता आहे.’’ ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.