राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कर्नाटकच्या कळसा प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८० वी बैठक ९ ऑक्टोबर या दिवशी झाली. या बैठकीत कर्नाटक सरकारचा काळी आणि सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रांमधील १०.७ हेक्टर भूमी कळसा धरण प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

गोव्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या वाढत्या घटना

हिंदूबहुल देशात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना पहाता चोरांना पोलिसांचा कोणताच धाक वाटत नाही, हेच लक्षात येते !

राज्यात विविध प्रकल्पांना ग्रामस्थांचा तीव्र विरोध !

थिवी येथील ग्रामसभेत पुणेस्थित खासगी विद्यापीठ प्रकल्पाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.

गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.

गोव्याची भोगभूमी नाही, तर ‘देवभूमी’ अशी ओळख निर्माण करा !

पवित्र अशा गोमंतकीय देवभूमीचा भोगभूमी अशी प्रतिमा बनवण्याचा देशभर प्रयत्न होत आहे. तेथे केवळ समुद्रकिनारे आणि कॅसिनो आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो.

शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस

शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी व्यापक मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍या १०० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काणकोण येथील मंदिरांतील चोर्‍यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ?

मूळ माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मस्कत, ओमान स्थित मूळ गोव्यातील माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

काणकोण येथील चावडी बाजारात हिंदूंकडूनही भाजीविक्रीला प्रारंभ

चावडी, काणकोण येथील शनिवारच्या बाजारात दसर्‍याच्या मुहुर्तावर श्री. अजित पै यांनी भाज्या, फळे, फुले यांचे दुकान चालू केले आहे. याद्वारे श्री. अजित पै यांनी एक नवीन पायंडा घालून दिला.