पवित्र अशा गोमंतकीय देवभूमीचा भोगभूमी अशी प्रतिमा बनवण्याचा देशभर प्रयत्न होत आहे. तेथे केवळ समुद्रकिनारे आणि कॅसिनो आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न होतो. गोव्यामध्ये १ सहस्र ५०० मंदिरे आहेत. येथे ७० टक्के हिंदू रहातात, तसेच ते हिंदु संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात. असे असतांना गोवा हे ‘कॅथॉलिक राज्य’ असल्याचे सांगणे चुकीचे आहे. याच गोव्यामध्ये गेल्या १२ वर्षांपासून ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष केला जातो. हे एक तप आहे. त्यामुळे गोव्याची भोगभूमी ही प्रतिमा पालटून तिला ‘देवभूमी’ अशी ओळख देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.
– श्री. जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ.